News Flash

फ्रेंच ओपन जिंकूनही नदालचे अव्वल स्थान धोक्यात…

फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असले तरीही त्याच्या अव्वल स्थानाला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररमुळे धोका निर्माण होऊ शकणार आहे.

स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदाल याने नुकतेच फ्रेंच ओपन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयामुळे त्याचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान टिकून आहे. मात्र या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असले तरीही त्याच्या अव्वल स्थानाला दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररमुळे धोका निर्माण होऊ शकणार आहे.

जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानचा खेळाडू नदाल याने ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिमचे आव्हान सरळ तीन सेट्समध्ये नमवले आणि अकराव्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेतेपदावर मोहोर नोंदवली. त्याने ही लढत ६-४,६-३, ६-२ अशी जिंकली. नदालने हा सामना २ तास ४२ मिनिटांत जिंकला. सामन्यात थिमला एकही सेट जिंकता आला नाही.

नदालने यापूर्वीही २००५ ते २००८, २०१० ते २०१४ तसेच गतवर्षी विजेतेपद मिळवले होते. हे त्याचे अकरावे विजेतेपद आहे. हे विजेतेपद पटकावत त्याने मार्गारेट कोर्ट यांच्या अकरा विजेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली. तसेच, नदालचा हा कारकिर्दीतील सतरावा ग्रँड स्लॅम विजय आहे. त्याने अमेरिकन स्पर्धेत तीन वेळा, विम्बल्डनमध्ये दोन वेळा तर ऑस्ट्रेलियन स्पर्धेत एकदा जेतेपद पटकावले आहे.

मात्र, त्याच्या आवळा स्थानाला फेडररकडून धक्का लागण्याची शक्यता आहे. फेडरर हा दीर्घ विश्रांतीनंतर स्टुगार्ट ओपन या स्पर्धेतून पुनरागमन करत आहे. या स्पर्धेत जर फेडरर तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला, नदालला आपले अव्वल स्थान गमवायला लागण्याची भीती आहे. फेडरर तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचला तर, जागतिक क्रमवारीतील त्याचे गुण वाढतील आणि त्यामुळे नदालच्या स्थानाला धक्का बसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 7:03 pm

Web Title: french open rafael nadal roger federer top seeding
Next Stories
1 … तेव्हाच नदाल घेणार होता निवृत्ती
2 भारतीय संघाकडून क्षमतेचे दर्शन!
3 बांगलादेशच्या विजेतेपदात मराठी मोहोर
Just Now!
X