News Flash

सेरेनाचा संघर्षमय विजय

फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीतील लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्ध विजय मिळवताना तिला झगडावे लागले.

| June 1, 2015 01:47 am

फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेत अग्रमानांकित सेरेना विल्यम्सला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या फेरीतील लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काविरुद्ध विजय मिळवताना तिला झगडावे लागले. अ‍ॅना इव्हानोविक व एलिना स्वितोलिना यांनी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आगेकूच केली.  
जागतिक क्रमवारीतील अव्वल दर्जाची खेळाडू सेरेना हिला अझारेन्का हिने कौतुकास्पद लढत दिली. अटीतटीने झालेला हा सामना सेरेना हिने ३-६, ६-४, ६-२ असा जिंकून चौथी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये सेरेना हिला सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर नियंत्रण ठेवता आले नाही. तथापि दुसऱ्या सेटमध्ये तिला सूर k12गवसला. तिने खेळावर नियंत्रण ठेवताना चतुरस्र खेळाचा
प्रत्यय घडविला व विजयश्री खेचून आणली.
सातव्या मानांकित इव्हानोविक हिने रशियाची खेळाडू एकतेरिना माकारोवा हिचा ७-५, ३-६, ६-१ असा पराभव केला. सर्बियन खेळाडू इव्हानोविक हिने सव्‍‌र्हिस व परतीचे फटके यावर चांगले नियंत्रण राखले होते. तिने बेसलाइन व्हॉलीजचाही सुरेख खेळ केला.  युक्रेनच्या स्वितोलिना हिला स्थानिक खेळाडू अ‍ॅलिझ कॉर्नेट हिने दुसऱ्या सेटमध्ये चिवट लढत दिली. तथापि स्वितोलिना हिने सव्‍‌र्हिस व फोरहँडचे फटके यावर नियंत्रण ठेवीत हा सामना ६-२, ७-६ (११-९) असा जिंकला.
पुरुषांच्या दुहेरीत अमेरिकेच्या बॉब व माइक ब्रायन या बंधुंनी अपराजित्व राखले. अग्रमानांकित ब्रायन बंधुंनी जेरेमी चार्डी (फ्रान्स) व लुकाझ क्युबोट (पोलंड) यांच्यावर ६-४, ७-५ अशी मात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 1:47 am

Web Title: french open serena williams beats victoria azarenka
Next Stories
1 ठाण्याची भरारी
2 मोहन बागानचे पहिले ‘आय लीग’ जेतेपद
3 जपानचा निशिकोरी तळपला
Just Now!
X