News Flash

French Open Super Series Badminton – किदम्बी श्रीकांतची अंतिम फेरीत धडक, एच.एस. प्रणॉयवर केली मात

अंतिम फेरीत जपानच्या निशीमोटाशी लढत

किदम्बी श्रीकांत (संग्रहीत छायाचित्र)

भारताच्या एच.एस. प्रणॉयची झुंज मोडून काढत किदम्बी श्रीकांतने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने प्रणॉयची झुंज १४-२१, २१-१८, २१-१९ अशी मोडून २०१७ या वर्षात सलग पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीकांतने या वर्षांत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क ओपन सुपरसिरीज स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सिंगापूर ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीकांतला भारताच्याच साई प्रणीतकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. अंतिम फेरीत श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशीमोटोशी होणार आहे.

अवश्य वाचा – French Open Super Series Badminton – पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव

या सामन्यात श्रीकांतने जोरदार पुनरागमन करत सामन्यात बाजी मारली. प्रणॉयने २१-१४ अशा फरकाने पहिला सेट जिंकत सामन्यात चांगली सुरुवात केली होती. त्यामुळे श्रीकांतचं पाचव्या सुपर सिरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याचं स्वप्न भंगणार असं वाटत होतं. मात्र श्रीकांतने दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन करत सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडीत काढत किदम्बी श्रीकांतचा विक्रम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2017 10:58 pm

Web Title: french open super series badminton 2017 kidambi shrikanth beat hs pranoy and enter final round
टॅग : Kidambi Shrikanth
Next Stories
1 FIFA U-17 World Cup – अंतिम सामन्यात इंग्लंडची स्पेनवर ५-२ ने मात
2 Pro Kabaddi Final – गतविजेत्या पाटणा पायरेट्सची विजयाची हॅटट्रिक, अंतिम फेरीत गुजरातवर मात
3 French Open Super Series Badminton – पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव
Just Now!
X