News Flash

थिम प्रथमच अंतिम फेरीत

साचिनाटोची विजयी मालिका खंडित

साचिनाटोची विजयी मालिका खंडित

डॉमिनिक थिमने माकरे साचिनाटोची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली आणि फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची प्रथमच अंतिम फेरी गाठली. ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.

थिमने राफेल नदालसह अनेक मातब्बर खेळाडूंना एटीपी स्पर्धामध्ये पराभूत केले असले तरी आजपर्यंत त्याला ग्रँडस्लॅम स्पर्धेत चौथ्या फेरीकडे पोहोचता आलेले नव्हते. त्याने साचिनाटोवर ७-५, ७-६ (१२-१०), ६-१ असा विजय मिळवला. साचिनाटोने उपांत्यपूर्व फेरीत जगज्जेत्या नोव्हात जोकोव्हिचला पराभूत करीत खळबळ उडवली होती. त्यामुळेच उपांत्य फेरीत त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा निर्माण झाल्या होत्या, मात्र चिवट लढतीनंतर थिमने त्याला हरवले.

‘‘साचिनाटो हा अतिशय जिगरबाज खेळाडू आहे. जोकोव्हिचवर त्याने मात केली होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध मी सुरुवातीला सावध खेळ केला. पहिल्या दोन्ही सेट्समध्ये त्याने खूप जिद्दीने खेळ केला. विशेषत: टायब्रेकर खूप रंगतदार झाला. हे दोन्ही सेट घेतल्यानंतर माझा आत्मविश्वास उंचावला. हा सामना तिसऱ्या सेटमध्येच संपवण्याच्या निर्धारानेच मी खेळलो. या सेटमध्ये मी फोरहॅण्डचे आक्रमक फटके मारू शकलो त्याचप्रमाणे सव्‍‌र्हिसवरही नियंत्रण ठेवू शकलो. आता शनिवारी मला शांतपणे विश्रांती घेता येईल. अंतिम फेरीत कोण प्रतिस्पर्धी असेल, हे पाहूनच मी त्याप्रमाणे व्यूहरचना करणार आहे,’’ असे थिमने सांगितले.

पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी हॅलेपपुढे स्टीफन्सचे आव्हान

पॅरिस : ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या जवळ पोहोचल्यानंतर काही खेळाडूंना विलक्षण दडपण येते व पराभवास सामोरे जावे लागते. महिलांच्या विभागात अग्रमानांकित सिमोना हॅलेपला आजपर्यंत तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ही अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी तिला शनिवारी अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सशी झुंजावे लागणार आहे.

हॅलेपने गर्बिन मुगुरुझावर दणदणीत विजय मिळव अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी येथे २०१४ व २०१७मध्ये तिला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच २०१७मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील जेतेपदानेही तिला चकवले होते. फ्रेंच विजेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच तिने आजपर्यंत वाटचाल केली आहे. स्टीफन्सने येथे उपांत्य फेरीत आपल्या देशाचीच खेळाडू मेडिसन कीजवर मात केली होती.

पहिल्या फ्रेंच विजेतेपदासाठी हॅलेप आणि स्टीफन्स उत्सुक

ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या जवळ पोहोचल्यानंतर काही खेळाडूंना विलक्षण दडपण येते व पराभवास सामोरे जावे लागते. महिलांच्या विभागात अग्रमानांकित सिमोना हॅलेपला आजपर्यंत तीन वेळा ग्रँडस्लॅम विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत ही अपयशाची मालिका खंडित करण्यासाठी तिला शनिवारी अमेरिकेच्या स्लोआनी स्टीफन्सशी झुंजावे लागणार आहे.

हॅलेपने गर्बिन मुगुरुझावर दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी येथे २०१४ व २०१७मध्ये तिला अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच २०१७मध्ये ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील जेतेपदानेही तिला चकवले होते. फ्रेंच जेतेपद मिळवण्याच्या निर्धारानेच तिने आजपर्यंत वाटचाल केली आहे. स्टीफन्सने येथे उपांत्य फेरीत आपल्या देशाचीच खेळाडू मेडिसन कीजवर मात केली होती. तिने २०१७ मध्ये अमेरिकन खुल्या स्पर्धेत विजेतेपदावर मोहोर उमटवली होती. अंतिम फेरीचा तिलाही अनुभव असल्यामुळे उद्याची अंतिम लढत चुरशीने खेळली जाईल अशी अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:51 am

Web Title: french open tennis tournament 2
Next Stories
1 फक्त एका हंगामानंतर समीर दिघेचा मुंबईच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा
2 अबब! न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाच्या ५० षटकात ४९० धावा!
3 खेळाडूंच्या पैशानेच खेळाडूंचं भलं; हरयाणा सरकारचा अजब निर्णय
Just Now!
X