Kargil Vijay Diwas २६ जुलै १९९९ हा दिवस सर्व भारतीयांच्या हृदयावर अभिमानाने कोरला गेलेला दिवस आहे. कारण याच दिवशी भारतीय सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी सैन्याला चारीमुंड्या चीत करीत युद्ध जिंकले होते. सुमारे अडीच महिने चाललेल्या या ‘ऑपरेशन विजय’मध्ये देशाने ५२७ पेक्षा अधिक वीर योद्धे गमावले. तर १३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले. आज संपूर्ण देशभरात कारगील विजय दिवस साजरा केला जात असून शहिदांना आदरांजली वाहिली जात आहे.

भारतीय क्रीडापटूंनीही आजच्या दिवसाचं औचित्य साधून, देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांना मानवंदना दिली आहे.