News Flash

..तरीही श्रेयस अय्यरला ‘आयपीएल’चे पूर्ण मानधन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली.

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये एकही सामना न खेळताही दुखापतग्रस्त फलंदाज श्रेयस अय्यरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) खेळाडू विमा योजनेनुसार संपूर्ण नुकसानभरपाई मिळणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पुण्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली. या गंभीर दुखापतीवर ८ एप्रिलला शस्त्रक्रिया होणार असून, त्याला चार महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. परिणामी दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसला यंदाच्या ‘आयपीएल’मधून माघार घ्यावी लागली आहे. पण तरीही दिल्ली कॅपिटल्सकडून मिळणारे सात कोटी मानधन त्याला ‘बीसीसीआय’च्या खेळाडू विमा योजनेमुळे मिळू शकणार आहे. २०११मध्ये लागू करण्यात आलेल्या या धोरणानुसार, ‘बीसीसीआय’शी करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूला दुखापत किंवा अपघातामुळे ‘आयपीएल’मधून माघार घ्यावी लागली तरी पूर्ण नुकसानभरपाई मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2021 12:07 am

Web Title: full ipl honorarium to shreyas iyer akp 94
Next Stories
1 कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीत योगदानासाठी उत्सुक -उमेश
2 श्रीलंका-विंडीज कसोटी मालिका : विंडीज-श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णीत
3 दुबई पॅराबॅडमिंटन स्पर्धा : भगत, कदम अंतिम फेरीत
Just Now!
X