News Flash

सानियाबरोबरची जोडी कामगिरीवरच अवलंबून – हिंगिस

सानिया मिर्झाबरोबरची माझी जोडी तात्पुरती असून महिलांच्या टेनिस स्पर्धेतील सामन्यांमधील कामगिरीवरच अधिक काळ जोडी ठेवायची की नाही हे अवलंबून आहे, असे माजी जागतिक अव्वल

| March 8, 2015 12:37 pm

सानिया मिर्झाबरोबरची माझी जोडी तात्पुरती असून महिलांच्या टेनिस स्पर्धेतील सामन्यांमधील कामगिरीवरच अधिक काळ जोडी ठेवायची की नाही हे अवलंबून आहे, असे माजी जागतिक अव्वल  मानांकित खेळाडू मार्टिना हिंगिस हिने सांगितले.  सानिया हिने या मोसमात चार स्पर्धानंतर सू वेई हिश (चीन तैपेई) हिच्याशी फारकत घेण्याचा निर्णय घेतला. ती आता हिंगिसच्या साथीत खेळणार आहे. हिंगिस म्हणाली, सू वेई व सानिया यांची शैली खूप वेगळी असल्यामुळे अपेक्षेइतके यश त्यांना मिळाले नाही. सानिया फोरहँडच्या फटक्यांबाबत माहीर आहे तर मी बॅकहँडने चांगला खेळ करू शकते. साहजिकच आमची जोडी चांगली जमेल अशी मला खात्री आहे. काही महिने एकत्र खेळण्याची इच्छा असली तरीही पहिल्या काही स्पर्धामध्ये आमची कामगिरी कशी होते यावरच आम्ही पुढचे नियोजन करणार आहोत.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 12:37 pm

Web Title: future of partnership with sania mirza depends on results martina hingis
टॅग : Sania Mirza
Next Stories
1 सूर्यकुमार, सर्फराज यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस
2 केदार जाधव सर्वात महागडा खेळाडू
3 ज्वाला-अश्विनीचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X