07 July 2020

News Flash

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : साथियानसह भारताचे आव्हान संपुष्टात

साथियानने तिसऱ्या आणि चौथ्या गेममध्ये चांगली लढत दिली

जी. साथियान

नवी दिल्ली : बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या ‘आयटीटीएफ’ जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत जी. साथियानला पराभवाचा धक्का बसल्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या ब्राझीलच्या ह्युगो काल्डेरानोने उपउपांत्यपूर्व सामन्यात साथियानला ४-० (११-६, ११-३, ११-९, ११-९) असे नामोहरम केले. या सामन्यात ह्युगोने फोरहँड आणि बॅकहँडच्या प्रभावी फटक्यांनिशी जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानावर असलेल्या साथियानवर वर्चस्व गाजवले. साथियानने तिसऱ्या आणि चौथ्या गेममध्ये चांगली लढत दिली. परंतु तो सामन्याचे चित्र पालटू शकला नाही. पहिल्या फेरीत बेल्जियमच्या रॉबिन डेव्हॉसचा ४-० असा पाडाव करणाऱ्या साथियानने बुधवारी रोमानियाच्या ख्रिस्तियन प्लीटीचा ४-१ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 3:05 am

Web Title: g sathiyan crashes out of world table tennis
Next Stories
1 ‘टीम इंडिया’ला विश्वचषकाची आस
2 IPL 2019 : दिनेश कार्तिकचं शतक हुकलं, कोलकात्याकडून दुसऱ्या सर्वोत्तम खेळीची नोंद
3 अजिंक्य रहाणेचं काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय
Just Now!
X