News Flash

विश्वचषक टेबल टेनिस स्पर्धा : भारताचा साथियान उपउपांत्यपूर्व फेरीत

साथियानने ड-गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह अग्रस्थान मिळवले.

| November 30, 2019 02:26 am

चेंगडू (चायना) : भारताच्या जी. साथियानने क्रमवारीत उच्च स्थानांवर असलेल्या प्रतिस्पर्ध्याना नामोहरम करीत आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत ३०व्या स्थानावर असलेल्या साथियानने फ्रान्सच्या सिमॉन गॉझीचा ४-३ (११-१३, ९-११, ११-८, १४-१२, ७-११, ११-५, ११-८) असा पराभव केला. मग दुसऱ्या लढती त्याने जागतिक क्रमवारीत २४व्या स्थानावरील डेन्मार्कच्या ग्रोथ जोनाथनला ४-२ (११-३, १२-१०, ७-११, १६-१४, ८-११, ११-८) असे पराभूत केले. साथियानने ड-गटाच्या गुणतालिकेत ४ गुणांसह अग्रस्थान मिळवले. उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने शनिवारी खेळवण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 2:26 am

Web Title: g sathiyan defeated jonathan groth in table tennis mens world cup zws 70
Next Stories
1 सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा : सौरभ, रितूपर्णा यांचा उपांत्य फेरीत प्रवेश
2 मानसिक आरोग्याचा समतोल राखणे महत्त्वाचे -द्रविड
3 Video : अभिमन्यूने भेदलं चक्रव्यूह; पाच चेंडूत पाच बळी घेण्याचा अनोखा विक्रम
Just Now!
X