आशियाई खेळांसाठी भारतीय नेमबाजी संघटनेने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यावेळी भारतीय संघात गगन नारंग, जितू राय, मेहुली घोष यांसारख्या खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे एकच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा आणि गेले काही दिवस दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या विजय कुमारने भारतीय संघात पुनरागमन केलं आहे.

महिलांमध्ये हिना सिद्धु, मनू भाकेर, राही सरनौबत यांना भारतीय संघात स्थान मिळालेलं आहे. आशियाई खेळांसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे असेल….

सिनीअर रायफल – मेन्स थ्री पोजिशन : संजीव राजपूत, अखिल शेरॉन
एअर रायफल – रवी कुमार, दिपक कुमार
३०० मी. स्टँडर्ड रायफल – हरजिंदर सिंह, अमित कुमार
एअर रायफल मिश्र – रवी कुमार, अपुर्वी चंदेला

——————————————————-

महिला थ्री पोजिशन्स – अंजुम मुद्गील, गायथ्री एन
एअर रायफल – अपुर्वी, एलवेनिल वालरिवन

——————————————————–

सिनीअर पिस्तुल पुरुष – (एअर पिस्तुल) अभिषेक वर्मा, सौरभ चौधरी
रॅपिड फायर पिस्तुल – शिवम शुक्ला, अनिष
एअर पिस्तुल मिश्र – अभिषेक वर्मा, मनू भाकेर

——————————————————–

महिला एअर पिस्तुल – मनू, हिना सिद्धु,
स्पोर्ट्स पिस्तुल – राही सरनौबत, मनू

———————————————————

सिनीअर शॉटगन पुरुष (ट्रॅप) – लक्ष्य, मानवजितसिंह संधू,
स्किट – शेराज शेख, अंगदवीर बाजवा
डबल ट्रॅप – अंकुर मित्तल, शार्दुल विहान
ट्रॅप मिश्र – लक्ष्य, श्रेयसी सिंह

————————————————————

महिला ट्रॅप – श्रेयसी सिंह, सीमा तोमर
स्किट – गनमीत सेखॉन, रश्मी राठोड
डबल ट्रॅप – श्रेयसी सिंह, वर्षा वर्मन