भारताविरुद्धच्या मालिकेला आठवडय़ाभराचा अवधी असताना ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने ‘बौद्धिक’ डाव रचण्यास प्रारंभ केला आहे. सलामीवीर गौतम गंभीरला कसोटी संघातून वगळण्याचा निर्णय हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसाठी सुखद धक्का आहे, असे क्लार्कने म्हटले आहे. गंभीरसारखा दर्जेदार फलंदाज भारतीय संघात असायला हवा होता. भारतीय संघाला त्याच्या अनुभवाची मोठी उणीव भासेल, असा युक्तिवाद क्लार्कने केला आहे.
‘‘गंभीर मला भारतीय संघात अपेक्षित होता. गंभीर अप्रतिम खेळाडू आहे आणि बरीच वष्रे तो संघातून खेळतो आहे. पण तो भारतीय संघात नसल्यामुळे अनेक ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.