जर श्रीलंकेने त्यांच्या संघातील गोलंदाजांसाठी उपयुक्त अशा खेळपट्टय़ा बनवल्या तर ते भारतीय संघाला अडचणीत आणू शकतात, असे मत भारताचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले.

‘‘या दौऱ्यासाठी भारताचा संघ नक्कीच श्रीलंकेपेक्षा वरचढ आहे. आतापर्यंत दोन्ही संघांच्या खेळावर नजर फिरवली तर श्रीलंकेकडे भारताचे २० फलंदाज बाद करण्याची क्षमता दिसत नाही. त्यामुळे त्यांनी जर खेळपट्टय़ा आपल्या गोलंदाजांसाठी पोषक बनवल्या तरच श्रीलंकेला भारतीय संघाला अडचणीत टाकता येऊ शकले,’’ असे गंभीर म्हणाला.