03 June 2020

News Flash

Video: लाडक्या मुलीच्या गोलंदाजीवर गौतमची ‘गंभीर’ परीक्षा

गौतमने शेअर केला व्हिडीओ

गौतम गंभीर आपल्या लाडक्या मुलीसोबत (संग्रहीत छायाचित्र)

आपल्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीत गौतम गंभीरने अनेक गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं होतं. कसोटी क्रिकेट असो किंवा वन-डे, गौतम गंभीरला कोणत्या टप्प्यात गोलंदाजी करायची हा अनेकांना प्रश्न पडायचा. मात्र या प्रश्नाचं उत्तर गौतम गंभीरची लाडकी मुलगी आझीनने दिलं आहे. आपल्या मुलीच्या शाळेत गेलेल्या गौतम गंभीरला, उपस्थित शिक्षकांनी क्रिकेट खेळण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत गौतमने हातात बॅट घेतली. यावेळी आपल्या बाबांना फलंदाजी करताना पाहून आझीनने चेंडु हातात घेऊन आपल्या बाबांना गोलंदाजी केली. बाप-लेकीच्या नात्यातला हा सुंदर क्षण गौतमने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

गौतमच्या या व्हिडीओवर कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने, तुझ्या मुलीला कोलकाता नाईट रायडर्सच्या सराव शिबीरात गोलंदाजी करण्यासाठी घेऊन ये; अशा आशयाचा प्रेमळ संदेश दिला आहे.

गौतम गंभीर सध्या रणजी करंडकात दिल्लीच्या संघाकडून खेळतो आहे. या स्पर्धेत आतापर्यंत गौतमने चांगल्या धावा काढल्या आहेत. नुकत्याच उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यात गौतमने ८६ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 9:13 pm

Web Title: gautam gambhir faces daughter aazeens bowling at her school watch video
Next Stories
1 आशियाई अजिंक्यपद कबड्डी सराव शिबीरातून अनुप कुमारला वगळलं
2 मेरी कोमचा विजयी ‘पंच’; पाचव्यांदा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत
3 एका अपयशी खेळीनंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होणं दुर्दैवी – सुनील गावसकर
Just Now!
X