News Flash

“टीम इंडिया’कडे बेन स्टोक्सच्या तोडीचा क्रिकेटर नाही”

माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत

वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली. ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. तसेच फलंदाजांच्या यादीतही त्याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. आता त्याच्या पुढे केवळ विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ दोनच फलंदाज आहेत. स्टोक्सचा कामगिरीच्या बळावर इंग्लंडने सामना जिंकला आणि त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.

बेन स्टोक्सच्या खेळीनंतर त्याची अनेकांनी स्तुती केली. त्यातच भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचीही भर पडली. बेन स्टोक्सच्या तोडीचा क्रिकेटपटू सध्या भारतातच नव्हे तर जगात कोणत्याही इतर संघाकडे नाही असे मत गौतम गंभीरने व्यक्त केले. “भारतातील कोणताही खेळाडू सध्या बेन स्टोक्सच्या तोडीचा नाही. स्टोक्स सध्या स्वत:शीच स्पर्धा करतो आहे. त्याच्या आसपास कोणीही नाही. त्याने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये केलेली कामगिरी पाहून त्याची कुणाशी तुलना होऊच शकत नाही. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता भारतातच नव्हे तर जगातही कोणता खेळाडू त्याच्या तोडीचा आहे असे मला वाटत नाही.

“पुढाकार घेऊन कामगिरी करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी कर्णधारच असावं लागतं असं काही नाही. तुमच्या कामगिरीच्या बळावर तुम्ही कर्णधार नसतानाही संघाचं नेतृत्व करू शकता. आता खूप जण स्टोक्सचा खेळ पाहत आहेत. पण दुर्दैवाने त्याच्या तोडीचा सध्या तरी तो एकटाच आहे”, असे गंभीरने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 3:45 pm

Web Title: gautam gambhir says we can not compare anyone in team india with ben stokes at the moment vjb 91
Next Stories
1 Video : …अन् ‘तो’ प्रकार पाहून भर मैदानातच रूटला हसू अनावर
2 Video : काही समजण्याआधीच फलंदाजाचा उडाला त्रिफळा
3 ENG vs WI : वेस्ट इंडिजविरूद्ध अँडरसनचा विक्रम; मॅकग्रा, कपिल देव यांच्या पंगतीत स्थान
Just Now!
X