भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर शनिवारी आपला अखरेचा रणजी सामना खेळत आंध्र प्रदेशविरुद्ध शतक झळकावत त्याने आपली कारकीर्द संपवली. मात्र गौतम गंभीरने आज तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने महेंद्रसिंह धोनीवर केलेल्या टीकेमुळे तो चर्चेत आला होता. त्यावरून नेटिझन्सने गंभीरवर सडकून टीका केली आहे.

२०१२ साली ऑस्ट्रेलियातील सीबी सिरीजमधले धोनीने कर्णधार म्हणून घेतलेले काही निर्णय हे माझ्यासाठी धक्कादायक होते, असं गौतम म्हणाला. या मालिकेत ऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान धोनीने कर्णधार या नात्याने गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर या तिन्ही खेळाडूंना एकाच वेळी सामन्यात संधी देता येणार नाही हे स्पष्ट केलं होतं. हे तिन्ही खेळाडू मैदानात क्षेत्ररक्षणादरम्यान जास्त धावा देत असल्याचं कारण धोनीने दिले असे गंभीर म्हणाला होता. त्यावरून नेटिझन्सने त्याला चांगलेच धारेवर धरलं.