तब्बल 18 महिन्यांच्या कालावधीनंतर विंडीजच्या वन-डे संघात पुनरागमन करणाऱ्या ख्रिस गेलने इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज शतकी खेळी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. ख्रिस गेलने 135 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 12 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकच्या शाहीद आफ्रिदीला मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं. याचसोबत गेलने आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. एका प्रतिस्पर्धी संघाविरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकणारा गेल पहिला फलंदाज ठरला आहे.
अवश्य वाचा – गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह
गेलने आतापर्यंत इंग्लंडविरोधात 31 वन-डे सामन्यांमध्ये 57, 11 टी-20 सामन्यांमध्ये 28 आणि 20 कसोटी सामन्यांमध्ये 15 षटकार लगावले आहेत. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विंडीजच्या फलंदाजांनी एका डावात तब्बल 23 षटकार लगावले. ही कामगिरी करत विंडीजने न्यूझीलंडच्या नावावर एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. मात्र 360 धावांचा डोंगर उभा करुनही विंडीज सामन्यात बाजी मारु शकली नाही.
अवश्य वाचा – अबब ! एकाच डावात 23 षटकार, विंडीजच्या फलंदाजांची विक्रमी खेळी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2019 12:04 pm