वेस्ट इंडिजचा सलामीवीर आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये Universal Boss नावाने ओळखला जाणारा ख्रिस गेल पुढचा काहीकाळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी गेलने विश्वचषक स्पर्धेनंतर क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय तात्पुरता मागे घेत गेलने घरच्या मैदानावर भारताविरुद्ध खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अवश्य वाचा – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघासमोर सलामीलाच वेस्ट इंडिजचं आव्हान

३ ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. “माझी कारकिर्द अजुन संपली नाहीये. विश्वचषकानंतर मी कदाचीत भारताविरुद्ध मालिकेत खेळेन. कसोटी, वन-डे क्रिकेटमध्ये मला खेळण्याची इच्छा आहे. मात्र टी-२० क्रिकेट मी खेळणार नाहीये हे मात्र नक्की.” विश्वचषकात भारताविरुद्ध सामन्याआधी गेल पत्रकारांशी बोलत होता.

अवश्य वाचा – विंडीज दौऱ्यात विराट कोहली-जसप्रीत बुमराहला विश्रांती