News Flash

विश्व अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा : पहिल्याच फेरीत गीता फोगट पराभूत

विश्व अजिंक्यपद स्पर्धेत गेल्यावर्षी कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या गीता फोगटचे आव्हान यंदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.

| September 20, 2013 12:20 pm

विश्व अजिंक्यपद स्पर्धेत गेल्यावर्षी कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या भारताच्या गीता फोगटचे आव्हान यंदा पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. अझेरबैजानची ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती युलिया रात्केव्हिचने गीताला ५९ किलो वजनी गटात पहिल्याच फेरीत पराभूत केले. त्याचबरोबर भारताच्या पुजा धांडा (५५ किलो) आणि गीतिका जाखर (६३ किलो) यांचेही आव्हान पहिल्या फेरीतच संपुष्टात आले आहे.
गेल्या वर्षी ५५ किलो वजनी गटात खेळताना गीताने कांस्यपदकाला गवसणी घातली होती. पण यावेळी ५९ किलो वजनी गटात खेळताना मात्र गीताला आपली कामगिरी कायम राखता आली नाही. युलियाविरुद्ध खेळताना गीताने सुरुवातीला तीन गुण पटकावले होते, पण त्यानंतर युलियाने दमदार खेळ करत गीताची पाठ टेकवण्यात यश मिळवले आणि विजयासह दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुजाला गतवर्षीची कांस्यपदक विजेती युक्रेनच्या इरिना हुसयाकने ०-८ असे पराभूत केले, तर गीतिकावर बेलारुसच्या मारिया मामाशुकने ५-० पहिल्या फेरीत विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2013 12:20 pm

Web Title: geeta phogat crashes out in first round of world wrestling
टॅग : Wrestling
Next Stories
1 कर्णधार क्लार्कबाबत अनिश्चितता कायम
2 वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा मालिकेवर कब्जा
3 आता खेळा बिनधास्त..
Just Now!
X