25 February 2021

News Flash

जर्मनीचा नॉर्वेवर धडाकेबाज विजय

उल्लेवाल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात म्युलर याने १६ व्या मिनिटाला जर्मनीचे खाते उघडले.

| September 6, 2016 02:59 am

गतविजेत्या जर्मनीने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या (२०१८) पात्रता फेरीत धडाकेबाज सुरुवात केली. थॉमस म्युलर व जोशुआ किमिच यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या जोरावर त्यांनी नॉर्वेला ३-० असे सहज हरविले.

उल्लेवाल स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात म्युलर याने १६ व्या मिनिटाला जर्मनीचे खाते उघडले. पूर्वार्धातच किमिच याने जर्मनीस २-० अशी आघाडी मिळवून दिली. म्युलर याने उत्तरार्धात आणखी एक गोल करीत संघास सफाईदार विजय मिळविण्यात सिंहाचा वाटा उचलला.

साखळी ‘क’ गटात जर्मनीने आघाडीस्थान घेतले आहे. अझरबैजान संघाने सॅन मरिनो संघाचा १-० असा पराभव केला. उत्तर आर्यलड संघास मात्र चेक प्रजासत्ताकविरुद्ध गोलशून्य बरोबरी स्वीकारावी लागली.

जर्मनीने आतापर्यंत चार वेळा विश्वविजेतेपद मिळविले आहे. इटलीने १९३८ मध्ये या स्पर्धेत विजेतेपद राखण्याची किमया केली होती. जर्मनीने २०१८ मध्ये विजेतेपद राखले तर अशी कामगिरी करणारा तो इटलीनंतरचा पहिला युरोपियन संघ असेल. नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात प्रारंभापासूनच जर्मनीचे वर्चस्व होते. म्युलर याने पहिल्या दहा मिनिटांत दोनतीन सुरेख चाली केल्या मात्र नॉर्वेच्या बचावरक्षकांनी या चाली परतविल्या. तथापि १६ व्या मिनिटाला त्याने नॉर्वेचा गोलरक्षक जेस्र्टीन याला चकवीत गोल केला. पुढच्याच मिनिटाला त्याचा सहकारी किमिच याला गोल करण्याची संधी चालून आली होती. मात्र त्यामध्ये त्याला यश मिळाले नाही. २४ व्या मिनिटाला नॉर्वेच्या जोश किंग याने मारलेला चेंडू गोलपोस्टवरून गेला. पूर्वार्ध संपण्यास काही सेकंद बाकी असताना जर्मनीच्या किमिच याला पुन्हा चांगली संधी मिळाली. त्याचा फायदा घेत त्याने गोल चढविला.

जर्मनीने उत्तरार्धातही जोरदार चाली केल्या. म्युलर याने सामी खेदिरा याच्या पासवर गोल करीत संघास ३-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलसह त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपली गोलसंख्या ३४ केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 2:59 am

Web Title: germany beat norway in football
Next Stories
1 प्रणव-सिक्की जोडीला जेतेपद
2 ‘टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीन’
3 जिद्द, चिकाटी असल्यास यशाची खात्री
Just Now!
X