जर्मनी आणि इंग्लंड संघांनी फुटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेतील युरोपियन गटात मंगळवारी परस्पर विरोधी विजयाची नोंद केली. गतविजेत्या जर्मनीने नॉव्‍‌र्हेवर ६-० असा दणदणीत विजय मिळवला, तर इंग्लंडला स्लोव्हाकियाविरुद्ध २-१ असा विजय मिळवल्यासाठी संघर्ष करावा लागला.

‘क’ गटातील लढतीत जर्मनीने टिमो वेर्नरच्या दोन गोलच्या जोरावर हा विजय निश्चित करताना पात्रता स्पध्रेतील आठ सामन्यांत विजयाची मालिका कायम राखली. मात्र, याच गटात दुसऱ्या स्थानावर असलेल्या उत्तर आर्यलडने २-० अशा फरकाने चेक प्रजासत्ताकवर मात करून जर्मनीच्या मार्गातील अडथळा कायम राखला आहे. त्यामुळे गतविजेत्यांना रशियाचे तिकीट निश्चित करण्यासाठी ५ ऑक्टोबपर्यंतच्या लढतीची वाट पहावी लागणार आहे. नॉव्‍‌र्हेविरुद्धच्या लढतीत वेर्नरला (२१ व ४० मि.) मेसूट ओझील (१० मि.),ज्युलियन ड्रॅक्सलर (१७ मि.), लियॉन गोरेत्झका (५० मि.) आणि मारियो गोमेझ (७९ मि.) यांची उत्तम साथ लाभली. दुसरीकडे ‘फ’ गटातील सामन्यात इंग्लंडने ०-१ अशा पिछाडीवरुन मुसंडी मारली.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
rohan bopanna and matthew ebden win miami open men s doubles title
मियामी खुली टेनिस स्पर्धा : बोपण्णा-एब्डेन जोडीला विजेतेपद
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू

स्टॅलिस्लॉव्ह लोबोत्काने तिसऱ्याच मिनिटाला स्लोव्हाकियाला आघाडी मिळवून दिली आणि इंग्लंडवर दडपण निर्माण केले. मात्र, ३७व्या मिनिटाला एरिक डायरने अप्रतिम गोल करत सामना बरोबरीत आणला. ५९व्या मिनिटाला मार्कस रशफोर्डच्या गोलने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. इंग्लंडचा हा आठ सामन्यांतील सहावा विजय असून २० गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत.