News Flash

ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी मोहालीला हिरवा कंदील

पाहणीनंतर आयसीसीने मोहालीच्या पीसीए स्टेडियमला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांसाठी हिरवा कंदील दिला.

| December 15, 2015 05:23 am

ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी मोहालीला हिरवा कंदील
मोहालीच पीसीए स्टेडियम

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीनंतर आयसीसीने मोहालीच्या पीसीए स्टेडियमला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांसाठी हिरवा कंदील दिला आहे.
आयसीसीच्या कार्यक्रम विभागाचे अध्यक्ष ख्रिस टेटली आणि बीसीसीआयच्या दौरा विभागाचे संचालक एम. व्ही. श्रीधर हे दोघेही रविवारी रात्री मोहालीमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी या दोघांनी एकत्रितपणे स्टेडियमची पाहणी केली असून सामन्यांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या पाहणीनंतर त्यांनी पीसीए स्टेडियमच्या संघटकांबरोबरही चर्चा केली.
‘‘सोमवारी सकाळी आयसीसी आणि बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितरीत्या स्टेडियमची पाहणी केली. त्याचबरोबर स्टेडियममधील सुविधाही त्यांनी जाणून घेतल्या. मैदानातील सुरक्षेबाबतही त्यांनी चौकशी केली. या सर्व पाहणीनंतर त्यांनी कोणताही दोष दाखवला नाही. ते या पाहणीनंतर आनंदी आहेत,’’ असे या विश्वचषकातील सामन्यांच्या ठिकाणाचे व्यवस्थापक आणि पीसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रिगेडिअर जी. एस. संधू यांनी सांगितले. पीसीए स्टेडियमवर २५ मार्चला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सामना होणार आहे. त्याचबरोबर २७ मार्चला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुरुषांचा आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामधील महिलांचा सामना होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 4:59 am

Web Title: get green single to mohali stadium for t20 world cup
Next Stories
1 मतभेद विसरून जोश्ना व दीपिका पुन्हा एकत्र
2 महाराष्ट्राच्या विजयाची हॅट्ट्रिक
3 मॅग्नस कार्लसनला विजेतेपद
Just Now!
X