नव महाराष्ट्र क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पध्रेत १८ वष्रे मुला-मुलींच्या गटात अनुक्रमे संदेश शेबे व गीता चाचेरकरने बाजी मारली. १४ वष्रे मुलांमध्ये यश कुंभलकर तर मुलींमध्ये ऐश्वर्या कचरेने बाजी मारली.
चिटणीस पार्क येथून शर्यतीला प्रारंभ झाला. नगरसेवक सुधीर राऊत, रश्मी फडणवीस, क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते गिरीश गदगे यांनी विविध शर्यतींना झेंडी दाखवली. कांचन गडकरी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. प्रत्येक गटातील प्रथम धावपटूंना रोख पुरस्कार देण्यात आले. यावेळी नागपुरातील क्रॉस कंट्रीचे जनक परमजीत सिंग खुराणा आणि माजी धावपटू जे. एस. मून यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार विकास कुंभारे, नगरसेविका रश्मी फडणवीस, भाऊ काणे उपस्थित होते.
निकाल : (१८ वष्रे मुले – ६ कि.मी.) : संदेश शेबे (नव महाराष्ट्र – १९ मि.१४ सेकंद), नंदू भुजाडे (नव महाराष्ट्र – २० मि. ०९ सेकंद), प्रणय पोटे (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ – २० मि. १३ सेकंद), प्रिन्स कुमार, दिशांत वर्मा, हेमंत पराये, सचिन राऊत, विक्की बावणकर, शिवम ओगले, अतुलराज कृष्णा.
(१८ वष्रे मुली -४ कि.मी.) : गीता चाचेरकर (विश्वव्यापी विद्यालय वेलतूर – १२ मि. ४७ सेकंद), पुनम नाळे (क्रीडा प्रबोधिनी – १२ मि. ५५ सेकदं), दिव्या नखाते (विश्वव्यापी वेलतूर – १३ मि. २४ सेकंद), निकीता भुमरे, निकीता पवार, दिव्या आकरे, याशिका वाघमारे, भावना नागठाणे, श्व्ोता कदम, सविता हिरवे.
(१४ वष्रे मुले -२.५ कि.मी.) – यश कुंभलकर (विद्यार्थी युवक), साहिल लहाने (एस.पी.जी. उमरेड), आलेश आंबुले (महाराष्ट्र विद्यालय खापरखेडा), पंकेश उके, ज्ञानदीप रेवतकर, अन्मेष समरीत,
मयूर शेंडे, अमन शिंदे, रितेश भोपे, समशेर खान. (१४ वष्रे मुली – २.५ कि.मी.) – एैश्वर्या कचरे (क्रीडा प्रबोधिनी), प्रगती राखडे (क्रीडा प्रबोधिनी), अवंती हटवार (नव महाराष्ट्र), निकीता तलमले, विधी परिहार, निधी गवळे, तन्नू लिल्हारे, सलोनी चौधरी, अमृता अडेलवार, श्रेया हलमारे.