News Flash

विश्वचषकासाठी हॉकी संघ निवडताना ओल्टमन्स यांना स्वातंत्र्य द्यावे -काव्‍‌र्हालो

विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदक मिळविणे, ही सोपी गोष्ट नाही. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली होण्यासाठी भारतीय

| September 15, 2013 05:58 am

विश्वचषक हॉकी स्पर्धेत पदक मिळविणे, ही सोपी गोष्ट नाही. या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली होण्यासाठी भारतीय हॉकीचे उच्च कामगिरी संचालक रोलॅन्ट ओल्टमन्स यांना पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू जोकिम काव्‍‌र्हालो यांनी सांगितले. भारताने नुकत्याच झालेल्या आशिया चषक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले. या कामगिरीबाबत विचारले असता काव्‍‌र्हालो म्हणाले, ‘‘या स्पर्धेत भारताने अजिंक्यपदच मिळविणे आवश्यक होते. साखळी गटात आपण दक्षिण कोरियावर विजय मिळविला होता, हे लक्षात घेता अंतिम फेरीत पुन्हा या विजयाची पुनरावृत्ती करणे गरजेचे होते. भारताने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले तरी या कामगिरीबाबत मी समाधानी नाही. विश्वचषक स्पर्धेचे स्थान निश्चित करण्यासाठी ही स्पर्धा जिंकणे आवश्यक होते. हे लक्षात घेता आपली कामगिरी त्या दर्जाची अपेक्षित होती. आपल्या खेळाडूंनी गोल करण्याच्या अनेक संधी गमावल्या.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2013 5:58 am

Web Title: give freedom to choose team to oltmans for world cup karvalo
Next Stories
1 शिक्षेचा स्पॉट!
2 गॅरेथ बॅलेच्या पदार्पणाची उत्सुकता
3 फिफा विश्वचषकाचा करंडक भारतात येणार