ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरिया येथे लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे. त्याचा फटका अनेक कुटुंबाना बसताना दिसत आहे. अशा परिस्थितीत त्यांना धीर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत केली जात आहे. त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी ऑस्ट्रेलियातील क्रिकेटपटू पुढे सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, धडाकेबाज फलंदाज ख्रिस लिन आणि डावखुरा फलंदाज डार्सी शॉर्ट या तिघांनी यांनी या कुटुंबीयांना मदत मिळावी यासाठी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

हार्दिकनंतर आता ‘या’ खेळाडूचा नंबर? प्रेयसीसोबतच्या फोटोनंतर चर्चांना उधाण

सध्या ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीगची धूम चालू आहे. या स्पर्धेत अनेक धमाकेदार खेळी पाहायला मिळत आहेत. याचाच आधार घेत मॅक्सवेल, लिन आणि शॉर्ट या तिघांनी खेळाडूंनी बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) प्रत्येक षटकार मारल्यानंतर २५० डॉलर्स निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरियामध्ये लागलेल्या आगीत सर्वात जास्त नुकसान झाले आहे.

हार्दिक-नताशाच्या फोटोवर बॉलिवूड अभिनेत्याची वादग्रस्त कमेंट

“सध्या बिग बॅश लीगमध्ये मी जेवढे षटकार मारेन, त्या प्रत्येक षटकारासाठी मी २५० डॉलर्स निधी देईन. विविध क्रीडापटू नैसर्गिक संपत्ती वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे पाहणे खूप चांगला अनुभव आहे.” असे लिनने आपल्या ट्विटमध्ये लिहीले आहे.

लीन, तुझी कल्पना मस्त आहे. मी देखील तुझ्याप्रमाणेच प्रत्येक षटकारामागे २५० डॉलर्स निधी देईन. त्यानंतर डार्सी शॉर्टनेही याबाबत ट्विट करत याच कल्पनेला सकारात्मक पाठिंबा दर्शविला.

मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपासून लागलेल्या या आगीत आतापर्यंत तब्बल 5 लाख वन्यजीवांना आपला जीव गमावला आहे. ऑस्ट्रेलियातील जवळपास ५ राज्यांमध्ये ही आग पसरली असून ही आग १.२ कोटी एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरली आहे. या आगीत १८ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण अजून बेपत्ता आहेत. त्यामुळे या परिस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी मदतीसाठी हात पुढे केला आहे.