पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं १९ चेंडूत तुफानी ४५ धावांची खेळी केली. सिडनीमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात फिंच, स्मिथ, वॉर्नर आणि मॅक्सवेलच्या दमदार फलंदाजीच्या बळावर ३७४ धावांचा डोंगर उभा केला आहे. आयपीएलमध्ये सुपरफ्लॉप ठरलेल्या मॅक्सवेल आणि फिंचनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात तुफानी फलंदाजी करत भरातीय गोलंदाजांची धुलाई केली. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे आयपीएल टीम आणि भारतीय खेळाडू ट्रोल होत आहेत. यामध्ये ग्लेन मॅक्सवेल सर्वाधिक चर्चेत आहे. मॅक्सवेलला आयपीएलमध्ये एकही षटकार लगावता आला नव्हता पण पहिल्याच सामन्यात मॅक्सवेलनं पाच षटकार लगावले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर पंजाब आणि राहुल चांगलेच ट्रोल होत आहे.

मॅक्सवेलच्या तुफानी खेळीनंतर पंजाबचे फलंदाजी कोच वसीम जाफर यांनीच के.एल राहुलला ट्रोल केलं आहे. तसेच राजस्थान रॉयलनेही पंजाबला टॅग करत ट्विटरवर ट्रोल केलं आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये मॅक्सवेलनं लौकिकास साजेशी फलंदाजी केली नव्हती. त्याची कामगिरी निराशजनक आहे. युएईत पार पडलेल्या आयपीएलध्ये मॅक्सवेलला एकही षटकार लगावता आला नव्हता. पण पहिल्या एकदिवसीय सामन्यात याच्या विरोधात फलंदाजी करत १९ चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकार लगावले.

मॅक्सवेलच्या दमदार कामगिरीनंतर पंजाबचे फलंदाजी कोच वसीम जाफर यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट कर राहुलला ट्रोल केलं आहे. या फोटोमधून जाफर यांनी राहुलची सद्याची स्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जाफरच नव्हे तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनही राहुल आणि पंजाब संघाला ट्रोल केलं आहे. राजस्थाननं ट्विट करत म्हटलेय की, मॅक्सवेल षटकार लगावतो, काय हाल आहेत पंजाबचे?

नेटकऱ्यांनी स्मिथच्या फलंदाजीनंतर राजस्थानलाही ट्रोल केलं आहे. आयपीएलमध्ये राजस्थानकडून स्मिथच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. दुसरीकडे फिंचने शतक झळकावल्यानंतर विराट आणि आरसीबीलाही ट्रोल करण्यात आलं आहे.