News Flash

कारकीर्दीची अर्धशतकपूर्ती!

सुनील गावस्कर यांचा गौरव

(संग्रहित छायाचित्र)

 

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्याच्या अर्धशतकपूर्तीनिमित्त भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना शनिवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महान फलंदाज गावस्कर आणि त्यांच्या त्या काळच्या सहकाऱ्यांनी क्रिकेटची पाळेमुळे भक्कम रोवली, अशा शब्दांत गांगुलीने त्यांची स्तुती केली.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या उपाहारादरम्यान गावस्कर यांचा ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांच्या हस्ते कसोटीतील संस्मरणीय टोपी देऊन सत्कार करण्यात आला. ‘‘गावस्करसोबत खेळल्याचा मला अभिमान वाटत आहे. माझ्यासाठी आदर्शवत असणाऱ्या गावस्कर यांच्यासह खेळताना मला अनेक गोष्टी शिकता आल्या. ते पक्के व्यावसायिक क्रिकेटपटू होते,’’ असे विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांनी गावस्कर यांचे गोडवे गायले.

गावस्कर यांची कारकीर्द

सामने  धावा   १००/५० सरासरी बळी

कसोटी  १२५ १०१२२  ३४/४५  ५१.१२  १

एकदिवसीय  १०८ ३०९२   १/२७       ३५.१३  १

प्रथम श्रेणी  ३४८ २५८३४  ८१/१०५     ५१.४६  २२

गावस्कर हेच माझे आदर्श – सचिन

मुंबई : प्रत्येकाचा कुणी तरी आदर्श असतो. लहानपणापासून मीसुद्धा सुनील गावस्कर यांनाच माझा आदर्श मानले होते. तेच माझे आदर्श आहेत, अशा शब्दांत महान फलंदाज सचिन तेंडुलकरने गावस्कर यांचे कौतुक केले. ‘‘५० वर्षांपूर्वी याच दिवशी क्रिकेटच्या मैदानात एक वादळ घोंघावले. पदार्पणाच्या मालिकेतच त्यांनी ७७४ धावा केल्या. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या या मालिकेनंतर इंग्लंडविरुद्धही विजय संपादन केला. त्यानंतर देशातील क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे लहानपणी गावस्कर यांच्यासारखे बनण्याचा माझा प्रयत्न होता. तेव्हापासून आतापर्यंत गावस्कर हेच माझे आदर्श आहेत,’’ असेही सचिनने सांगितले.

ठळक वैशिष्टय़े

* १९७१ ते १९८७ यादरम्यान गावस्कर यांनी १२५ कसोटी आणि १०८ एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

* वेस्ट इंडिजविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात गावस्कर यांनी दोन्ही डावांत अर्धशतके झळकावली होती. हा सामना भारताने सात गडी राखून जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली होती.

* कसोटी क्रिकेटमध्ये ते १० हजार धावा करणारे पहिले फलंदाज ठरले होते.

* १९८३च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असलेल्या गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आपल्या नावावर केला होता. २००५ मध्ये सचिन तेंडुलकरने हा विक्रम मागे टाकला.

* पदार्पणाच्या मालिकेतच ७७४ धावा करत गावस्कर यांनी वेस्ट इंडिजविरुद्धची ही मालिका भारताला जिंकून दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:11 am

Web Title: glory to sunil gavaskar abn 97
Next Stories
1 भारताचे लॉर्ड्स पक्के!
2 दोन ध्रुव!
3 सिंधू अंतिम फेरीत
Just Now!
X