22 September 2020

News Flash

आयएसएल फुटबॉल : गोव्याकडून पराभवाची परतफेड

गोवा एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चेन्नईत २-० असा विजय नोंदवला.

सामन्यातील एक रोमहर्षक क्षण.

चेन्नईयनवर २-० अशी मात करून पुन्हा अव्वल स्थानी
चेन्नईयन एफसीकडून घरच्या मदानावर झालेल्या दणदणीत पराभवाची परतफेड करीत गोवा एफसीने इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) चेन्नईत २-० असा विजय नोंदवला. या विजयामुळे गोव्याने गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
६४व्या मिनिटाला लिओ माऊराने पेनेल्टीवर गोल केला. चेन्नईयनचा बचावपटू वाडूने चेंडू हाताळल्यामुळे उत्तरार्धात ७८व्या मिनिटाला गोव्याला पेनल्टी किक बहाल करण्यात आली. त्यावर जोनाथन ल्युकाने या संधीचे सोने करून गोव्याला २-० अशी आघाडी मिळवून दिली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2015 6:00 am

Web Title: goa beat chennai 2 0 to top isl table
Next Stories
1 माद्रिद, मँचेस्टर सिटी बाद फेरीत
2 सरदार सिंगकडेच भारताचे नेतृत्व
3 जागतिक क्रमवारीत भरारी घेऊ!
Just Now!
X