News Flash

पोलंडमधील स्पर्धेत मेरी कोमला सुवर्णपदक, मनिषाची रौप्यपदकाची कमाई

मेरीचा आक्रमक खेळ

सुवर्णपदक विजेती मेरी कोम

भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने, पोलंड येथील ग्लिविसेत सुरु असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. ४८ किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा ५-० ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीमुळे मेरी कोमने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र यानंतर पोलंडमधील स्पर्धेमधून पुनरागमन करत मेरी कोमने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. भारताच्या मनिषानेही ५४ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.

अवश्य वाचा – सरिताला कांस्यपदक

संपूर्ण सामन्यात मेरी कोमच्या खेळापुढे तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभावच लागू शकला नाही. मेरीने उजव्या हाताने केलेले प्रहार तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चांगलेच वर्मावर बसले. याचसोबत ज्यावेळी कझाकिस्तानच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मेरीने तिचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या मनिषावर ३-२ ने मात केली. अटीतटीच्या झालेल्या सामन्या इव्हानाच्या आक्रमक खेळापुढे मनिषाचा निभाव लागू शकला नाही. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2018 10:32 am

Web Title: gold for mary kom manisha gets silver in polish boxing tourney
टॅग : Mary Kom
Next Stories
1 Asia Cup 2018 : तमिम इक्बाल आशिया चषकामधून बाहेर
2 कठीण काळात सचिनने मला आधार दिला – सरदार सिंह
3 पुन्हा एकदा पानिपत!
Just Now!
X