05 July 2020

News Flash

पुण्याच्या सिद्धी शिर्केची सुवर्णपदकाची कमाई

ट्रॅक सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राला ३ रौप्यपदके

ट्रॅक सायकलिंग प्रकारात महाराष्ट्राला ३ रौप्यपदके * राष्ट्रीय शालेय सायकल स्पर्धा

वृत्तसंस्था, पुणे

पुण्याच्या सिद्धी शिर्के हिने ६४व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने १४ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये अव्वल स्थान पटकावले. सिद्धीचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक ठरले. तिने रोड सायकलिंगमध्ये ६ किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये सुवर्णयश मिळवले होते.

भारतीय क्रीडा प्राधिकरण, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने म्हाळुंगे-बालेवाडी येथील वेलोड्रम स्टेडियममध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत मंगळवारी सिद्धी शिर्केने ४५.११० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. तामिळनाडूच्या एम. पूजा स्वेताने ४७.६१० सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक प्राप्त केले. तर महाराष्ट्रच्या सुहानी मोरेने ५२.५१७ सेकंदासह कांस्यपदकाची कमाई केली.

१४ वर्षांखालील मुलांच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये झारखंडच्या नारायण महतोने (४०.१८५ सेकंद) सुवर्णपदक प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अथर्व पाटीलला (४१.६८० सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. झारखंडच्या अर्णव श्री याने (४१.८३० से.) कांस्यपदक मिळवले.

१७ वर्षांखालील मुलींच्या ५०० मीटर टाइम ट्रायलमध्ये दिल्लीच्या लिकझेस अंगमोने ४३.७१० सेकंद अशी वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या मानसी कमलाकरला (४३.९६० सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दिल्लीच्या नावरम चंद हिने (४४.०७० सेकंद) कांस्यपदक मिळवले. याच प्रकारात मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या दीपक मुकणेने ३७.६९२ सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. पंजाबच्या अनमोलप्रीत सिंगने (३७.३४० सेकंद) सुवर्ण तर दिल्लीच्या संजय सरवानन ( ३७.६३० सेकंद) रौप्यपदक मिळवले.

१९ वर्षांखालील मुलांच्या १ किलोमीटर टाइम ट्रायलमध्ये दिल्लीच्या एम. तनिष्कने १ मिनिट १४.९८० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या प्रणव कांबळेने १ मिनिट २१.०११ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर तेलंगणाच्या के. प्रणयने १ मिनिट २१.२१० कांस्यपदक मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 1:53 am

Web Title: gold medal of pune siddi shirke in national school cycling competition
Next Stories
1 india vs australia : रोहित शर्माला विश्रांती?
2 विदर्भाच्या फिरकीपटूंचे शेष भारतावर वर्चस्व!
3 रूटच्या शतकामुळे इंग्लंड भक्कम स्थितीत!
Just Now!
X