News Flash

सीमाला सुवर्णपदक

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने शनिवारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भारताची कुस्तीपटू सीमा बिस्लाने शनिवारी जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

इक्वाडोरच्या लुसिया गुझमनने दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतल्याने २९ वर्षीय सीमाला विजयी घोषित करण्यात आले. २०१९मध्ये सीमाने यासार दोगू स्पर्धेत अखेरचे सुवर्णपदक जिंकले होते.

ग्रीको-रोमनमध्ये भारताची पाटी कोरी

जागतिक ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धेमधील ग्रीको-रोमन प्रकारात शनिवारी भारताची पाटी कोरी राहिली. त्यामुळे एकाही मल्लाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी स्थान निश्चित करता आली नाही. भारताला गुरप्रीत सिंगकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु ७७ किलो वजनी गटाच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात त्याचे आव्हान संपुष्टात आले. युरोपियन विजेत्या रफिग हुसेयनोव्हने (अझरबैजान) त्याचा ४८ सेकंदांत पराभव केला. हुसेयनोव्हने सुरुवातीलाच चार गुण मिळवले. त्यानंतर गुरप्रीत सावरण्याच्या आताच त्याने आणखी चार गुणांची कमाई करीत पहिल्याच सत्रात सामना जिंकला. गेल्या महिन्यात आशियाई पात्रता कुस्ती स्पध्रेत कांस्यपद मिळवणाऱ्या गुरप्रीतला पहिल्याच लढतीत पुढे चाल देण्यात आली होती.

ऑलिम्पिक पात्रता कुस्ती स्पर्धा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 12:27 am

Web Title: gold medal tokyo olympic seema ssh 93
Next Stories
1 क व च भं ग
2 ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूला शुभेच्छा देत ICCने काढली धोनीची कळ!
3 IPLच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी श्रीलंका उत्सुक
Just Now!
X