मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या कसोटीचा आनंद घेण्याची इच्छा असलेल्या लाखो क्रिकेटप्रेमींनी दाखविलेल्या प्रेमानंतर सामन्याची सर्व तिकीचे संपली आहेत. असे तिकीट विक्री करणाऱया Kyazoonga.com या संकेतस्थळाने आज मंगळवार जाहीर केले आहे.
सचिनसाठी आमिरची खास भेट
दरम्यान, काल सोमवार संकेतस्थळावर एकाचवेळी अनेकांनी लॉगइन केल्याने तिकीट विक्रीचे संकेतस्थळ क्रॅश झाले होते. त्यामुळे क्रिकेटरसिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले होते.
संबंधित संकेतस्थळाने सर्व्हर पुन्हा कार्यरत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु केले. सर्व्हर सुरू होताच अवघ्या पंधरा तासांत सर्व तिकीटे संपली. ऑनलाईन तिकीट घेण्यासाठी पहिल्या तासातच तब्बल दोन कोटी नव्वद लाख जणांनी संकेतस्थळाला भेट दिली असल्याचेही संकेतस्थळाने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
वानखेडे.. सचिनसाठी अनुकूल, पण भारतासाठी प्रतिकूल!
एमसीएकडून सचिनचे संस्मरणीय तिकीट
अल्पोपहारासह तिकीट फक्त रूपये १०,०००/-