रिओमध्ये पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला आजपासून सुरूवात झाली असून, १८ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने इंटरनेट महाजालातील सर्वात लोकप्रीय सर्च इंजिन ‘गुगल’ने एक खास डुडल देखील तयार केले आहे. या डुडलमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेतील विविध खेळांची ओळख करून देण्यात आली आहे. गुगलच्या इंग्रजी अद्याक्षरातील दुसऱया ‘ओ’ या अद्याक्षरात पॅरालिम्पिक स्पर्धेतील विविध खेळांचे स्लाईड शो तयार करण्यात आला आहे.

VIDEO: ..या पॅरालिम्पियनचा लक्ष्यवेध पाहून आश्चर्यचकीत व्हाल

रिओ ऑलिम्पिकच्या मुख्य स्पर्धेत भारतीय पथकाला केवळ दोन पदकांवर समाधान मानावे लागले होते. पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे १७ खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय खेळाडूला ७५ लाखांचे रोख पारितोषिक, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला ५० लाख आणि कांस्यपदक विजेत्या खेळाडूला ३० लाखांचे रोख पारितोषिक दिले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून मंगळवारी करण्यात आली आहे.