News Flash

डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना, ११० व्या वाढदिवसानिमीत्त खास डूडल

ब्रॅडमन क्रिकेटमधली सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक

सर डॉन ब्रॅडमन यांचं डूडल

ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांचा आज ११० वा वाढदिवस आहे. गुगलने सर ब्रॅडमन यांना आपल्या डूडलच्या माध्यमातून खास मानवंदना दिलेली आहे. ब्रॅडमन यांचा ठेवणीतला कव्हर ड्राईव्हचा फटका खेळतानाचं अॅनिमेटेड डूडल खास आजच्या दिवशी बनवण्यात आलेलं आहे. २७ ऑगस्ट १९०८ रोजी जन्म झालेल्या ब्रॅडमन यांना क्रिकेटमधले सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानलं जातं.

आपल्या कारकिर्दीत ब्रॅडमन यांनी तब्बल १२ कसोटी द्विशतकं झळकावली. ३३४ ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत असतानाही ब्रॅडमन यांनी धावांचा रतिब घातला होता. ९५.१४ च्या सरासरीने ब्रॅडमन यांनी स्थानिक क्रिकेटमध्ये २८ हजार ६७ धावा काढल्या. आपल्या अखेरच्या कसोटीत १०० ची सरासरी गाठण्यासाठी ब्रॅडमन यांना अवघ्या ४ धावांची गरज होती, मात्र ही कामगिरी करणं त्यांना जमलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 8:10 am

Web Title: google doodle celebrates don bradmans 110th birthday
टॅग : Google
Next Stories
1 Asian Games 2018 Day 9 : सुधा, नीना, आय्यासामीला रौप्य; सायनाला कांस्यपदक
2 Asian Games 2018 : भारतीय पुरुष संघही उपांत्य फेरीत
3 Asian Games 2018 : मातब्बर कबड्डीपटू द्विधा मन:स्थितीत
Just Now!
X