02 March 2021

News Flash

IPL 2020 चे सर्व सामने रात्री साडेसात वाजता, माजी भारतीय खेळाडू म्हणतो हाच निर्णय कायम ठेवा

गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत झाला निर्णय

यंदाचा हंगाम युएईत खेळवला जाणार असल्यामुळे सर्वच खेळाडूंचा कस लागणार आहे. टी-२० क्रिकेट म्हटलं की कोणता खेळाडू शतक झळकावणार याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असतं....आज आपण आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या ३ भारतीय फलंदाजांविषयी जाणून घेणार आहोत.

आयपीएलच्या तेराव्या हंगामाची अखेरीस अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. रविवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक पार पडली, ज्यात ही घोषणा करण्यात आली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. याचसोबत यंदाच्या स्पर्धेत सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आलेला असून सर्व सामने हे रात्री साडेसात वाजता सुरु करण्यात येणार आहेत. तसेच ज्या दिवशी डबल हेडर सामने असतील त्या दिवशी दुपारचा सामना हा साडेतीन वाजता सुरु करण्यात येणार आहे.

भारतीय कसोटी संघाचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये समालोचनाचं काम करणारा आकाश चोप्रा याने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापुढेही हाच निर्णय कायम ठेवा अशी मागणी आकाशने केली आहे.

याआधी तेराव्या हंगामाचा अंतिम सामना हा ८ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार होता. परंतू करोनामुळे तयार करण्यात आलेले नवीन नियम, भारतीय संघाचा आगामी ऑस्ट्रेलिया दौरा आणि दोन सामन्यांमध्ये खेळाडूंना पुरेसा वेळ मिळाला यासाठी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची तारीख बदलून ८ ऐवजी १० करण्यात आल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 9:52 am

Web Title: governing council change start time of ipl matches former indian player aakash chopra says make this permanent psd 91
Next Stories
1 IPL 2020 : इतिहासात पहिल्यांदाच घडली अशी गोष्ट, हा मोठा बदल तुम्हाला माहिती आहे का??
2 माजी रणजीपटूचा करोनाने घेतला बळी
3 #BoycottIPL…जाणून घ्या सोशल मीडियावर का होतोय आयपीएलला विरोध??
Just Now!
X