पुढील १० वर्षांत जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी राज्य शासनाकडून तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे, अशी घोषणा क्रीडामंत्री आशीष शेलार यांनी केली.

‘‘एकाच क्रीडा प्रकारासाठी नव्हे, तर सर्व क्रीडा प्रकारांसाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. या सुविधा तहसील, जिल्हा पातळीवरसुद्धा मिळतील. त्यामुळे राज्याची योजना टप्प्याटप्प्याने आणि व्यावसायिक पद्धतीने कार्यरत होईल,’’ असे शेलार यांनी सांगितले. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या अधिकाधिक वापरासाठी योग्य आराखडा तयार करण्यात येईल, असे शेलार यावेळी म्हणाले.