News Flash

पुण्यातील भारत-इंग्लंड मालिकेला शासनाची परवानगी

महाराष्ट्रात करोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते.

करोनामुळे प्रेक्षकांविना एकदिवसीय सामन्यांचे आयोजन

पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर होणाऱ्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला महाराष्ट्र शासनाकडून शनिवारी मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही परवानगी देताना सदर मालिकेतील सामने प्रेक्षकांविना घेण्याचे निर्देशही दिले आहेत.

महाराष्ट्रात करोना साथीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील मालिकेपुढे अनिश्चिततेचे वातावरण पसरले होते. ही मालिका व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विकास काकतकर यांनी शनिवारी मुंबई प्रीमियर लीगच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. ‘‘करोना साथीच्या पाश्र्वाभूमीवर खेळाडू आणि पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी खबरदारी घेऊन मालिकेचे आयोजन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आली. मालिकेच्या आयोजनाचा मार्ग मोकळा झाला असून, आता आवश्यक त्या अन्य परवानग्या घेता येतील. राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी महत्त्वाचे ठरले,’’ असे काकतकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 1:44 am

Web Title: government permission for india england series in pune akp 94
Next Stories
1 रविवार विशेष : खेळपट्टीवरून खडाष्टक!
2 Ind vs Eng : पुण्यात एकदिवसीय सामने होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट
3 रवी शास्त्रींनी स्वत:च्याच मीम्सवर दिला भन्नाट रिप्लाय
Just Now!
X