24 September 2020

News Flash

अमिरातीत ‘आयपीएल’ला सरकारची तत्त्वत: मान्यता

‘बीसीसीआय’चा दावा; खेळाडूंच्या विलगीकरणाची प्रक्रिया संघांकडून सुरू

संग्रहित छायाचित्र

 

इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३वा हंगाम संयुक्त अरब अमिरातीत खेळवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निर्णयाला केंद्र सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे क्रिकेटपटू आणि साहाय्यकांच्या कोविड चाचणी आणि विलगीकरण प्रक्रि येला संघांकडून प्रारंभ करण्यात आला आहे.

अमिरातीत ‘आयपीएल’च्या आयोजनासाठी लिखित परवानगी येत्या काही दिवसांत प्राप्त होईल. मात्र आम्हाला तत्त्वत: मान्यता मिळालेली आहे, असे ‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी सांगितले. ‘बीसीसीआय’ने २० ऑगस्टपर्यंत अमिरातीत जाऊ नये, असे निर्देश आले आहेत. त्यामुळे त्यानंतरच पोहोचण्याच्या संघांनी योजना आखल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज संघ २२ ऑगस्टला अमिरातीकडे प्रस्थान करणार आहे.

मुंबई इंडियन्सने भारतीय खेळाडूंना त्यांच्या शहरांतच विलगीकरण करायला सांगितले आहे. काही संघांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई किंवा बेंगळूरु येथून अमिरातीकडे प्रस्थान करण्यापूर्वी त्या शहरांतच कोविड-१९ चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘बीसीसीआय’च्या प्रमाणित कार्यपद्धतीनुसार खेळाडूंना दोन चाचण्यांमधील नकारात्मक निकालानंतरच अमिरातीला निघता येईल. काही संघांनी आपल्या खेळाडूंसाठी किमान चार चाचण्या बंधनकारक केल्या आहेत.

क्रिकेटपटू आणि साहाय्यकांना आपल्या कुटुंबीयांनाही अमिरातीत नेता येणार आहे. फक्त त्यांनाही जैव-सुरक्षा नियमांचे पालन करावे लागेल. प्रत्येक संघाला २४ खेळाडूंचे बंधन आहे; परंतु साहाय्यकांच्या संख्येचे नियम नाहीत. दर पाचव्या दिवशी कोविड-१९ चाचणी बंधनकारक असल्याने प्रत्येक संघासोबत सुसज्ज वैद्यकीय चमू असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:19 am

Web Title: government recognizes ipl in uae abn 97
Next Stories
1 युरोपा लीग फुटबॉल : सेव्हिया, वोल्व्हस उपांत्यपूर्व फेरीत
2 सिंधू, प्रणीत, सिक्की यांचा चार महिन्यांनी सरावाला प्रारंभ
3 “पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”
Just Now!
X