News Flash

विनेशच्या हंगेरीतील प्रशिक्षणाला सरकारची मंजुरी

‘टॉप्स’ योजनेचा भाग असलेल्या विनेशकडून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या अपेक्षा आहेत.

नवी दिल्ली : भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिच्यासह तिचे वैयक्तिक प्रशिक्षक वुलर अकोस तसेच सहकारी प्रियांका फोगट आणि फिजियोथेरपिस्ट पूर्णिमा रामन यांच्या हंगेरी आणि पोलंडमधील ४० दिवसांच्या प्रशिक्षणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.

‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप्स) योजनेंतर्गत या शिबिराला मान्यता देण्यात आली आहे. हंगेरीतील बुडापेस्ट येथे २८ डिसेंबर ते २४ जानेवारीदरम्यान तसेच पोलंड येथील ऑलिम्पिक सराव केंद्रात ५ फेब्रुवारीपर्यंत हे शिबीर रंगणार आहे. विमानखर्च, वाहतूक, राहणे-खाणे तसेच भत्ता म्हणून एकूण १५.५१ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

‘टॉप्स’ योजनेचा भाग असलेल्या विनेशकडून टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या अपेक्षा आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2020 2:14 am

Web Title: government sanctions 40 day hungary training camp for vinesh phogat zws 70
Next Stories
1 भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका : रहाणेच्या दुहेरी कौशल्याची कसोटी!
2 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रातील क्रीडा साहित्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी
3 …त्यानंतर विराटची माफी मागितली, रहाणेचा खुलासा