News Flash

पेले आले हो..! कोलकातामध्ये माजी महान फुटबॉलपटूचे जल्लोषात स्वागत

सिटी ऑफ जॉय असे वर्णन होणाऱ्या कोलकाता शहरात रविवारी अनोख्या आनंदाला उधाण झाले.

निमित्त होते सार्वकालीन महान फुटबॉलपटू पेले यांच्या आगमनाचे.

सिटी ऑफ जॉय असे वर्णन होणाऱ्या कोलकाता शहरात रविवारी अनोख्या आनंदाला उधाण झाले. निमित्त होते सार्वकालीन महान फुटबॉलपटू पेले यांच्या आगमनाचे. गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी जगप्रसिद्ध पेले यांचे सकाळी आगमन झाले आणि फुटबॉलप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला. पेले यांनी तब्बल ३८ वर्षांपूर्वी कोलकाता शहराला भेट दिली होती.

२४ तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतरही ताजेतवाने दिसणाऱ्या पेले यांनी काळा सूट परिधान केला होता. भारतीय फुटबॉलपटू चुनी गोस्वामी तसेच दीपेंदू विश्वास यांनी पेले यांचे स्वागत केले. ‘थँक यू कोलकाता’ असे म्हणत त्यांनी विमानतळावर जमलेल्या चाहत्यांना त्यांनी अभिवादन केले. पेले यांच्या आगमनाचे वृत्त समजताच त्यांच्या चाहत्यांचे जथे अलिपोर मार्गावर जमा होऊ लागले. या परिसरातील पंचतारांकित हॉटेलात पेले यांचे तीन दिवस वास्तव्य आहे. चाहत्यांनी एकच गर्दी केल्यामुळे पेले यांच्या सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली.
एका खासगी कार्यक्रमात पेले यांच्यासह संगीतकार ए. आर. रहमान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच टेनिसपटू राफेल नदाल सहभागी होणार आहेत. तीनदिवसीय भेटीदरम्यान पेले दुर्गापूजा समारंभालाही भेट देणार आहेत. तिसऱ्या दिवशी पेले इंडियन सुपर लीग स्पर्धेतील अ‍ॅटलेटिको कोलकाता आणि केरळ ब्लास्टर्स यांच्यातील लढतीला उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 4:48 am

Web Title: grand welcome to pele at kolkata
Next Stories
1 विशेष खेळाडूंना सन्मानपूर्वक वागणूक मिळेल -सोनवाल
2 दिल्लीचा विदर्भवर विजय
3 द.आफ्रिकेकडून भारताचा ५ धावांनी पराभव
Just Now!
X