भारताचा ग्रँडमास्टर अभिजीत गुप्ताला दुबई आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत विजयाने हुलकवणी दिली. इराणचा ग्रँडमास्टर इडानी पौयाविरुद्ध त्याला बरोबरीत समाधान मानावे लागले. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळणाऱ्या गुप्ताने सामन्याच्या मध्यंतरापर्यंत आघाडी निश्चित केली होती आणि त्यामुळे त्याला विजयाची संधीही होती. मात्र, इडानीने जबरदस्त पुनरागमन करून त्याच्याकडून ही संधी हिसकावली. इडानीने गुप्ताना सामन्यात डोक वर काढण्याची दुसरी संधी दिली नाही.