News Flash

सेंट लुइस बुद्धिबळ स्पर्धा : दोन पराभवांसह हरिकृष्णची घसरण

तीन फेऱ्यांअखेर हरिकृष्णने लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा ग्रँडमास्टर पी. हरिकृष्णला सेंट लुइस जलद आणि अतिजलद ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत इयान नेपोमनियाची आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागल्याने पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

तीन फेऱ्यांअखेर हरिकृष्णने लेव्हॉन अरोनियनसह संयुक्तपणे अग्रस्थान पटकावले होते. त्यानंतर चौथ्या डावात त्याला नेपोमनियाचीकडून पराभूत व्हावे लागले. पाचव्या डावात हरिकृष्णने अरोनियनविरुद्ध बरोबरी पत्करली. मात्र सहाव्या फेरीत त्याला कार्लसनकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, कार्लसनने जोमाने पुनरागमन करताना लागोपाठ तीन विजय मिळवून नऊ गुणांसह वैयक्तिकपणे अग्रस्थान प्राप्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:18 am

Web Title: grandmaster p harikrishna loses to ian nepomnia and jagjeta magnus carlsen in chess tournament abn 97
Next Stories
1 सिंधूची डेन्मार्क चषक स्पर्धेतून माघार
2 VIDEO: काय चाललंय काय… फिंचने मागितलेला DRS पाहून तुम्हीही हेच म्हणाल
3 सचिन, विराटसह क्रिकेटविश्वातून पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा
Just Now!
X