25 February 2021

News Flash

महान टेनिस प्रशिक्षक अख्तर अली यांचे निधन

अख्तर यांनी १९५८ ते १९६४ या कालावधीत आठ डेव्हिस चषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

भारताचे महान टेनिस प्रशिक्षक अख्तर अली (८३ वर्षे) यांचे रविवारी प्रदीर्घ आजारपणामुळे कोलकाता येथे निधन झाले. अख्तर यांच्या आक्र मक खेळाने देशातील अनेकांची कारकीर्द घडवली आहे. यात महान टेनिसपटू लिएण्डर पेस यांच्यासह त्यांचा मुलगा झीशान अली यांचाही समावेश आहे. झीशान सध्या भारताच्या डेव्हिस चषक संघाचे प्रशिक्षकपद सांभाळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाचा विजय अमृतराज आणि रमेश कृ ष्णन यांच्यावरही प्रभाव आहे.

अख्तर यांच्या कु टुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी कर्करोगावरील उपचारासाठी त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. झीशान कनिष्ठ राष्ट्रीय टेनिस शिबिरासाठी नवी दिल्लीत होता. परंतु वडिलांच्या निधनाचे वृत्त समजताच तो तातडीने कोलकाता येथे पोहोचला. अख्तर यांनी १९५८ ते १९६४ या कालावधीत आठ डेव्हिस चषक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्यांनी भारताचे कर्णधारपद आणि प्रशिक्षकपदही भूषवले आहे.

मी कनिष्ठ गटात खेळत असल्यापासून ते डेव्हिस चषक स्पर्धेसाठी प्रशिक्षक होईपर्यंत अख्तर यांचे मार्गदर्शन मला सदैव मिळाले. त्यांनी भारतीय टेनिसची प्रदीर्घ सेवा के ली आहे.

– विजय अम़ृतराज, भारताचे माजी टेनिसपटू

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 2:08 am

Web Title: great tennis coach akhtar ali akp 94
Next Stories
1 बांगलादेश-विंडीज कसोटी मालिका : मेयर्सच्या द्विशतकामुळे वेस्ट इंडिजचा विजय
2 आठवड्याची मुलाखत : ग्रँडस्लॅम स्पर्धांमधील कामगिरी भारतासाठी निर्णायक!
3 IND vs ENG : पंतचं शतक थोडक्यात हुकलं, भारतीय संघ ३२१ धावांनी पिछाडीवर
Just Now!
X