ग्रीसने आयव्हरी कोस्टवर २-१ अशी मात करत फुटबॉल विश्वचषकात यावेळी पहिल्यांदाच बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर, या पराभवासह आयव्हरी कोस्टचे विश्वचषचकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
सामारिसने सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला गोल करत ग्रीसला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर विल्फ्रेड बोनीने ७४ व्या मिनिटाला शानदार गोल करून आयव्हरी कोस्टला बरोबरी साधून दिली. परंतु, सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला सामारासने ‘पेनल्टी किक’च्या संधीवर गोल करून ग्रीसला विजय मिळवून दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 25, 2014 9:03 am