04 March 2021

News Flash

ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला ग्रीनच्या शतकामुळे आघाडी

ग्रीनच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी घेतली असून मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

(संग्रहित छायाचित्र)

भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना

प्रतिभावान अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने (खेळत आहे ११४) भारत ‘अ’ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात दमदार शतक झळकावून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघातील स्थानासाठी दावेदारी पेश केली. ग्रीनच्या शतकामुळे ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाने पहिल्या डावात ३९ धावांची आघाडी घेतली असून मंगळवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे.

तत्पूर्वी, रविवारच्या ८ बाद २३७ धावांवरून पुढे खेळताना तीन षटकांतच भारताने ९ बाद २४७ धावांवर पहिला डाव घोषित केला. कर्णधार अजिंक्य रहाणे ११७ धावांवर नाबाद राहिला. चेतेश्वर पुजाराने ५४ धावांचे योगदान दिले.

त्यानंतर उमेश यादवने दोन्ही सलामीवीरांना पाच धावांतच माघारी पाठवून दमदार सुरुवात केली. कर्णधार ट्रेविस हेड (१८), मार्कस हॅरिस (३५), टिम पेन (४४) चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलू शकले नाहीत. परंतु ग्रीनने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ११४ धावा फटकावून ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाला आघाडी मिळवून दिली.

भारताकडून उमेशने सर्वाधिक तीन बळी मिळवले असून कसोटी मालिकेसाठी तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून त्यालाच पंसती मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विन यांनीही प्रत्येकी दोन बळी मिळवले. कुलदीप यादवला मात्र अद्याप छाप पाडता आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:19 am

Web Title: green century gave australia a a valuable lead abn 97
Next Stories
1 पुरस्कार परतीसंदर्भातील खेळाडूंचा मोर्चा अडवला
2 विश्वचषकासाठी नरसिंह आणि राहुल सज्ज
3 एका मूत्रपिंडाद्वारे यश मिळवले -अंजू
Just Now!
X