23 February 2019

News Flash

सुवर्णकन्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव, ट्विटरवरुन दिग्गजांनी दिल्या शुभेच्छा

हिमाच्या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच ट्विटरवरुन अनेक दिग्गजांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हिमा दास

फिनलंडमधील टाम्पेरे येथे झालेल्या IAAF वर्ल्ड अंडर २० अथलॅटिक्स चॅम्पिअनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेल्या हिमा दासवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिमाच्या ऐतिहासिक विजयाची बातमी कळताच ट्विटरवरुन अनेक दिग्गजांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये राष्ट्रपती रामनात कोविंद, रितेश देशमुख, मोहम्मद कैफ, विरेंद्र सेहवाग, राज्यवर्धनसिंग राठोड यांचा समावेश आहे.

१८ वर्षीय हिमाने या स्पर्धेमधील अंतिम सामन्यात ५१.३२ सेकंदाचा विक्रम नोंदवला आहे. या मालिकेच्या उपांत्य फेरीत तिने ५२.१० सेकंदात पहिला क्रमांक पटकावला होता. पहिल्या राऊंडमध्ये देखील तिने ५२.२५ सेकंदाचा विक्रम केला होता. आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर २०मध्ये ५१.३२ सेकंदात रेस पार करीत सहाव्या स्थानावर राहिली होती.

हिमाच्या या ऐतिहासिक कामगिरीसाठी ट्विटरवरुन दिलेल्या शुभेच्छा….