ला लिगा फुटबॉल स्पध्रेतील पुरस्कारांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांची चालत आलेली मक्तेदारी अॅटलेटिको माद्रिदच्या अँटोइने ग्रिएझमनने मोडली. ला लिगा २०१५-१६च्या मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंच्या शर्यतीत मेस्सी व रोनाल्डो यांच्यावर मात करून ग्रिएझमनने बाजी मारली.
अॅटलेटिकोच्या डिएगो सिमोन यांनी सर्वोत्तम प्रशिक्षकाचा, तर बार्सिलोनाच्या लुईस सुआरेझने सर्वोत्तम युरोपीय देशाबाहेरील खेळाडूचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारांमध्ये अॅटलेटिकोचा दबदबा दिसला. सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून जॅन ओब्लॅक, बचावपटू म्हणून डिएगो गॉडीन या अॅटलेटिकोच्या खेळाडूंना गौरविण्यात आले आणि प्रेक्षकपसंतीचा पुरस्कार ग्रिएझमनने पटकावला. रिअल माद्रिदच्या लुका मॉड्रिकला सर्वोत्तम मध्यरक्षकाचा पुरस्कार देण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 26, 2016 3:30 am