13 July 2020

News Flash

गुढीपाडव्याला मुंबई इंडियन्सनं साजरी केली मकर संक्रांत, नेटीझन्सनी उडवली खिल्ली

सोशल मीडियावर चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

आयपीएलच्या हंगामात येणारे सण साजरे करताना मुंबई इंडियन्स आपल्या मराठी चाहत्यांना शुभेच्छा देताना आघाडीवर असतं. परंतु सणासुदीची नीट माहिती नसली नी केवळ संपर्क मोहीम म्हणून सण वापरले की कशी फजिती होते याचा दाखला गुढी पाडव्याला पाहिला मिळाला. मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या व मराठी म्हणता येतील अशा सिद्धेश लाड आणि सूर्यकुमार यादव या मुंबई इंडियन्सच्या क्रिकेटपटूंनी आपण गुढी पाडवा साजरा करताना तिळगुळ कसे वाटायचो हे सांगितलं आणि स्वत:ची तसेच संघाची फजिती करून घेतली आहे.

मुंबई इंडियन्सने आज सकाळी गुढी पाडव्याच्या सकाळी ट्विट करत आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, शुभेच्छा देताना खेळाडकडून चूक झाली आहे. रोहित शर्माने गुढी पाडव्याच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. सिद्देश लाड आणि सुर्यकुमार यादव यांनी गुढी पाडवा कसा साजरा करत होतो, हे सांगताना मकरसंक्रातीच्या तिळगुळाचा किस्सा सांगितला. सुर्यकुमार यादव आणि सिद्देश लाड यांच्यामुळे मुंबई इंडियन्सची सोशल मीडियावर चांगलिच फजिती झाली आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची चांगलीच खिल्ली उडवली आहे. गुढी पाडवा आणि मकर संक्रातीमधील फरक माहित नाही का? पूर्ण माहिती घेऊन व्हिडीओ तयार करायचा? मराठी असून गुढी पाडवा आणि संक्रातीमधील फरक माहित नाही का? असे प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले. चाहत्यांच्या नाराजीनंतर मुंबई इंडियन्सने अधिकृत ट्विट डिलीट केले आहे. मात्र, सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.

गुढी पाडवा म्हणजे नवचैतन्याचा, मांगल्याचा दिवस. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. या आनंदात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले असून सोशल मीडियावर जणू शुभेच्छांची गुढीच उभारली आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबई इंडियन्सनेही गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, सिद्धेश लाड आणि सुर्यकुमार यादव यांनी गुढी पाडव्याला संक्रात साजरी केल्यामुळे मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

दरम्यान, यंदाच्या हंगामात कामगिरीमध्ये चढउतार असणाऱ्या मुंबई इंडियन्सला आज शनिवारी होणाऱ्या लढतीत वॉर्नर-बेअरस्टोचा सामना करताना अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची उणीव तीव्रतेने भासणार आहे. मुंबईने मागील सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला नमवण्याची किमया साधली आहे, हेच त्यांच्यासाठी बलस्थान ठरू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2019 11:45 am

Web Title: gudi padwa 2019 mumbai indians team mistake wish gudi padawa
Next Stories
1 चेन्नई-पंजाब लढतीत धोनी-अश्विन यांच्या नेतृत्वक्षमतेची लढाई
2 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : मुंबईला मलिंगाची उणीव!
3 अफगाणिस्तानच्या कर्णधारपदावरून असगरची हकालपट्टी
Just Now!
X