News Flash

‘हा’ आहे टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज; पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

खेळाडूच्या गर्लफ्रेंडने पोस्ट केला बालपणीचा फोटो

भारतीय क्रिकेटचा मोठा सोहळा सध्या युएईमध्ये सुरू आहे. IPL 2020 या स्पर्धेत ८ संघ खेळत असून सारेच संघ एकमेकांना ‘काँटे की टक्कर’ देत आहेत. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा IPL हंगाम उशिरा खेळवण्यात येत आहे. करोनामुळे मार्चपासून भारतात लॉकडाऊन होता. त्या काळात अनेक सेलिब्रिटींचे जुने फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांना पाहायला मिळाले. मात्र आज एका खास कारणामुळे टीम इंडियाच्या एका स्फोटक फलंदाजाचा जुना फोटो चर्चेत आला आहे.

भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण करणारा एक धडाकेबाज खेळाडू आज त्याच्या बालपणीच्या फोटोमुळे आकर्षणाचा मुद्दा ठरला आहे. भारताचा नव्या दमाचा खेळाडू असलेल्या या खेळाडूच्या गर्लफ्रेंडने त्याचा बालपणीचा फोटो पोस्ट केला आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या खेळाडूचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एक फोटो हा त्याच्या बालपणीचा आहे, तर बाकीचे दोन फोटो आताचे आहेत. आपल्या स्टोरीवर तीन फोटो करण्यामागचं निमित्त आहे त्या क्रिकेटपटूचा वाढदिवस आणि तो खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. ऋषभची गर्लफ्रेंड असलेली इशा नेगी हिने त्याचे तीन फोटो पोस्ट केले आहेत. त्यातील एक फोटो त्याच्यासोबतचा आहे. तर एका फोटो त्याच्या तोंडावर केक फासल्याचा आहे.

ऋषभने त्याची गर्लफ्रेंड इशा नेगी हिच्याबरोबर २०२० या वर्षाचे स्वागत केले होते. ऋषभने तिच्या बरोबरचा एक फोटो पोस्ट केल्यामुळे ती चर्चेत आली होती. सर्वप्रथम ऋषभने जानेवारी २०१९ मध्ये आपल्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्यावेळी त्याने इशाबरोबरचा आपला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तेव्हापासून इशा नक्की आहे कोण? ती काय करते? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. इशा ही मूळची देहरादूनची आहे. इशा ही एका श्रीमंत अशा राजपूत कुटुंबातून आहे. तिचे वडील यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक आहेत. इशा इंटेरिअर डिझायनर असून तिने या विषयातील तंत्रशुद्ध शिक्षण घेतले आहे. तसेच ती यशस्वी उद्योजिका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 3:33 pm

Web Title: guess who team india cricketer rishabh pant childhood photo by girlfriend isha negi ipl 2020 vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : त्सित्सिपास चौथ्या फेरीत
2 पुढील वर्षी क्रीडा स्पर्धाना सुरुवात -रिजिजू
3 अर्थ ती देईल का?
Just Now!
X