X

हॉकी विश्वचषकासाठी ए. आर. रेहमान – गुलजार जोडी पुन्हा एकत्र

Title Song रचण्याची जबाबदारी

ज्येष्ठ गीतकार गुलझार आणि संगीतकार ए. आर. रेहमान ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येणार आहे. नोव्हेंबर महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठीचं Official Title Song गुलजार-रेहमान जोडी करणार आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान भुवनेश्वर येथील कलिंगा मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.ओडीशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन याची माहिती दिली आहे. अब बस हॉकी, असे या गाण्याचे बोल असणार आहेत. या गाण्यामध्ये रेहमान स्वतः काम करणार असून २७ नोव्हेंबर रोजी रंगणाऱ्या उद्घाटन सोहळ्यातही रेहमान स्वतः हे गाण सादर करणार आहे. आतापर्यंत रेहमान-गुलजार जोडीने अनेक सुपरहिट गाणी रचलेली आहेत. त्यामुळे हॉकी विश्वचषकाच्या गाण्याला प्रेक्षक किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

First Published on: September 22, 2018 8:55 am
  • Tags: gulzar, hockey-india,