28 September 2020

News Flash

मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा ठाम निर्धार

बेंगळूरुच्या गुरकीरत सिंग मानचे प्रतिपादन

बेंगळूरुच्या गुरकीरत सिंग मानचे प्रतिपादन

गतवर्षी आयपीएलमध्ये खेळायला मिळाले नव्हते. त्यामुळे यंदा संधी मिळाल्यापासून संघाला विजय मिळवून देणारी खेळी करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार हैदराबादविरुद्ध मिळालेल्या संधीचे सोने करण्यात यशस्वी झाल्याचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुचा फलंदाज गुरकीरत सिंग मान याने सांगितले.

यंदाच्या मोसमात केवळ तिसरा सामना खेळणाऱ्या गुरकिरतने ४८ चेंडूंत ६५ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे शिमरॉन हेटमायरसोबत दमदार भागीदारी रचत बेंगळूरुला विजय मिळवून देण्यात त्याने मोलाची कामगिरी बजावली.

‘‘मी तब्बल दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळलो. त्यामुळे दबावापेक्षाही संधी मिळण्याची मी वाट पाहात होतो. ती संधी मिळाली आणि मी संघाला विजय मिळवून देण्यात यशस्वी झालो,’’ असे गुरकीरतने नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2019 11:24 pm

Web Title: gurkeerat singh mann on ipl 2019
Next Stories
1 स्मिथ, वॉर्नर ऑस्ट्रेलिया संघात दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत
2 सद्य:स्थितीला ‘बीसीसीआय’ जबाबदार -सचिन
3 विश्वचषकासाठी संघातील स्थानाचा तणाव नाही
Just Now!
X